सामाजिक योगदानाबद्दल प्रा.बंडगर यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलनात सन्मान - Saptahik Sandesh

सामाजिक योगदानाबद्दल प्रा.बंडगर यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलनात सन्मान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : आज (दि.२४) बेलाटी (सोलापूर) येथील आदिवासी धनगर साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल ढोकरी (ता.करमाळा) येथील प्रा. शिवाजी बंडगर यांचा सन्मान करण्यात आला.

बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथे धनगर समाजाचे दोन दिवसीय पाचवे राज्य स्तरीय साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार रामहरी रूपनवर तर उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते.या संमेलनाच्या उद्घाटन सोहळा सत्रात राज्यभर आपल्या कार्य कर्तत्वाने सुपरिचीत असलेल्या समाजधुरीणांचा सन्मान करण्यात आला.

या मधे उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर यांचा सोलापूर विद्यापीठ नामांतर चळवळ, उजनी धरणग्रस्तांसाठीचा संघर्ष, धनगर आरक्षण चळवळ ,शिक्षण क्षेत्रात विध्यार्थी व शिक्षक यांच्या साठीचे योगदान, बाजार समिती कर्जमुक्त करणे ,या बहुमूल्य बाबीसांठी घोंगडी,शाल , सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी श्रीपाल सबनीस, माजी आमदार रुपनवर, संमेलन संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले,स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, बाळासाहेब कर्णवर, संभाजी सूळ , प्राचार्य आर एस चोपडे ,प्रा बेडगणूर, प्रा सत्तूबर, सांगली नगरसेवक विष्णू माने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी करमाळा तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते,आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टकले,पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे,करमाळा मेडीकोज गील्ड चे डाॅक्टर अशोक शेळके,शेलगाव वां येथील बाळू मामा हलगी ग्रुप, धायखिंडी येथील गझीढोल संघ आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!