प्रा.गोवर्धन चवरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षणाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा येथील अ‍ॅड.प्रा.गोवर्धन जगन्नाथ चवरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षणाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

शरदचंद्रजी पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष ग्राहक संरक्षणाचे माजी मंत्री सुर्यकांत गवळी, जिल्हाअध्यक्ष काकासाहेब साठे यांच्या शिफारशीने मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २२ नोव्हेंबर रोजी चवरे-पाटील यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण प्रदेश सरचिटणीस पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

या निवडीनंतर करमाळा तालुका राष्ट्रवादी पार्टी व सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब साठे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अ‍ॅड.प्रा.गोवर्धन जगन्नाथ चवरे पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांच्या धडाडी व वक्तृत्व पाहून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची ही निवड केली आहे. ॲड प्रा.गोवर्धन चवरे पाटील यांच्यावर अहमदनगर उस्मानाबाद तसेच बीड या तीन जिल्ह्याची जबाबदारी पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री सुर्यकांत आप्पा गवळी यांनी दिली असल्याची माहिती चवरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!