ऊस बिलासाठी कुंभेज फाटा येथे १० एप्रिलला रास्ता रोको आंदोलन करणार – राजाभाऊ कदम

केम ( प्रतिनिधी/ संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील व तालुक्याबाहेरील साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर बिले देत नाही यासाठी १० एप्रिलला सोमवारी १० वाजता करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा रस्त्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी प्रसार माध्यमांना दिले.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मकाई साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना विहाळ,कमलाई साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील घोगरगाव, साई कृपा हिरडगाव व ईतर कारखान्याकडून नोव्हेंबर महिन्यापासून ऊस बिल दिले नाही. ऊस बिल मिळाले पाहिजे व वाहतूक बिले मिळाली पाहिजे म्हणुन बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकरीवर्गाने कुंभेज फाटा येथे भव्य रास्त रोको आंदोलन करणार आहे. ऊस बिले मिळाली नसल्यामुळे शेतकरी वर्गावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे तेंव्हा सर्व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनत सहभागी व्हावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!