मकाई ऊस बिला संदर्भातील गायकवाड यांचे उपोषण सहाव्या दिवशी थांबले..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मकाई सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षीच्या २०२२ च्या गळीत हंगामाची ऊस बिले दिली नसल्याने ही बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावीत यासाठी निलज येथील शेतकरी प्रा. प्रा.राजेश गायकवाड हे संगोबा येथे दि.३१ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले होते. आज (दि.५) उपोषणाचा सहावा दिवस होता. आज कारखाना प्रशासनास शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास अनेकांनी मध्यस्थी केली होती. त्यानुसार येत्या 8 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सरसकट बिले 2300 ₹ प्रति टन प्रमाणे बँकेत जमा केली जाणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी राजेश गायकवाड यांना दिले. त्यामुळे गायकवाड यांनी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे.
तहसीलदारांनी दिलेले आश्वासनाचे पत्र श्री. गायकवाड यांनी सर्वांच्या समक्ष वाचून दाखवले व त्यास सर्व शेतकरी वर्गाने मान्यता दिली. दिलेल्या लेखी आश्वासन मध्ये कसूर केल्यास सर्व पीडित शेतकरी तहसील ऑफिस समोर आत्म दहन करणार असल्याचे ऍड राहुल सावंत यांनी सांगितले.
काल (दि.४ नोव्हेंबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघल्यामुळे ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे प्रा.राजेश गायकवाड यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते.
सहाव्या दिवशी माजी संचालक दशरथ अण्णा कांबळे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे, डॉ केवारे, डॉ पुंडे,ऍड.राहुल सावंत,नायब तहसीलदार गायकवाड,मार्केट कमेटी चे माजी उप सभापती चिंतामणी जगताप,दत्त कला चे रामदास झोळ,तलाठी सोमनाथ खराडे, शेतकरी संघटनेचे अण्णा साहेब सुपनवर,अंजनडोह चे उपसरपंच शहाजीराव माने,रयत क्रांती पक्ष् चे जिल्हाध्यक्ष संतोष वार गड, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोडगे, व सर्व पदाधिकारी,राजाभाऊ कदम,पोटेगाव चे सरपंच अजिनाथ भागडे,सुनिल शिंदे, किरण भागडे, शेतकी अधिकारी शिवाजी कदम, ओ एस बनसोडे, आदींनी मध्यस्थी करून कारखाना प्रशासन यांस मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडले.
यावेळी बोरगाव चे सरपंच विनय ननवरे, घरगावचे सरपंच संजय सरवदे, संभाजी डावले,ढवळे, अविनाश गायकवाड, योगेश गायकवाड, डॉ शुभम गायकवाड, किरण गायकवाड, तात्यासाहेब भारत गायकवाड, पोलीस पाटील बळीराम राऊत, पिंटू भोज, दिनेश गायकवाड,वाल्मिक गायकवाड, आदींनी या उपोषणास परिश्रम घेतले.यावेळी घारगाव, पाडली, तारटगाव, खांबेवाडी, निलज, पोथरे, बोरगाव,पोटेगाव, भालेवाडी, अंजनडोह,कोंढेज, आळजापूर, बालेवाडी, भालेवाडी, दिलमेश्वर, कोर्टी, वाशीबे,शेटफळ, साडे, कुंभेज, लव्हे, जेऊर, सालसे, बिटरगाव, वांगी, वीट, करंजे, वाघाची वाडी,आदी गावचे ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.
- संबंधित बातम्या – मकाईच्या ऊस बिलासाठी प्रा. राजेश गायकवाड यांचे उपोषण सुरू
- मकाईचे चेअरमन भांडवलकर यांच्या सोबत झालेली चर्चा फिस्कटली – प्रा.गायकवाड याचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू