तळेकर विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

केम (संजय जाधव) : येथील महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ, केम संस्थेअंतर्गत राजाभाऊ तळेकर विद्यालय व श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर केम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या प्रांगणामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री महेश तळेकर (सर) व सचिव मा. श्री विनोद तळेकर सर आणि प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक मा. श्री नागनाथ तळेकर (सर) यांच्या हस्ते व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे पार पडले. याप्रसंगी दोन्ही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांविषयी आपली मनोगते व्यक्त केली. इयत्ता नववीच्या मुलींनी जिजाऊंचा महिमा सांगणारे गीत सादर केले. सर्व विद्यार्थिनी जिजाऊंची वेशभूषा करून आलेल्या होत्या.
कु. काजल काळे आणि कार्तिक दगडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे शिवगर्जना सादर केली. सदर कार्यक्रमास दोन्ही प्रशालेचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी तळेकर व सादीया शेख यांनी आणि आभारप्रदर्शन श्रेया येवले हिने केले. विद्यार्थ्यांना इयत्ता नववीच्या वर्ग शिक्षिका सौ. माळी मॅडम व सांस्कृतिक विभाग यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




