उत्तरेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठया उत्साहात साजरी

केम(संजय जाधव): श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच श्री स्वामी विवेकानंद सप्ताह उद्धाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे पुतळ्याचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ.पल्लवी सचिन रणशृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंद चित्ररथाचे उद्घाटन माननीय प्राध्यापक श्री अमोल तळेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत तळेकर,उपाध्यक्ष सौ पल्लवी सचिन रणशृंगारे,सचिन रणशृंगारे,विजयकुमार तळेकर,अनिल तळेकर,ज्येष्ठ राहुल रामदासी,लक्ष्मण गुरव शालेय व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य, केम गावाचे उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सागर कुरडे,प्राध्यापक अमोल तळेकर सर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली नरखेडकर,पर्यवेक्षक गिते सर,ज्येष्ठ शिक्षक बी.व्ही सांगवे सर यांनी केले. केम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा चित्ररथ हे मुख्य आकर्षण ठरले.डॉ.बापूजी साळुंखे यांचा विजय असो या घोषणेने विद्यार्थ्यांनी केम परिसरामध्ये चैतन्य निर्माण केले.राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.

केम गावातील उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री सागर कुरडे आणि सहशिक्षक जी.के जाधव सर ,श्री एस.एम घुगे सर यांनी प्रशालेला शालेय मैदान सुशोभीकरण करण्यासाठी आर्थिक मदत केली याबद्दल शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर,उपाध्यक्ष गणेश तळेकर,सौ पल्लवी सचिन रणशृंगारे सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी त्यांचा सत्कार केला तसेच प्रशालेने सुध्दा त्यांचे आभार मानले.विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सांस्कृतिक विभागप्रमुख के.एन वाघमारे सर यांनी मानले.




