“कंदर महावितरण”च्या गलथान कारभाराविरोधात रास्ता रोको आंदोलन करणार – सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे यांचा इशारा…
कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…
कंदर : कंदर (ता, करमाळा) येथे महावितरणचे 33 /11केव्ही चे कार्यालय असून या कार्यालयामार्फत अनेक वर्षापासून गलथान कारभार सुरू असून या कामकाजात सुधारणा न झाल्यास कोणतिही पुर्व सूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंदर चे सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी महावितरणच्या सोलापूर कार्यालयास निवेदन पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की कंदर येथे महावितरण 33/11केव्ही चे उपकेंद्र असून त्या केंद्र अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होत आहे .कायम कर्मचारी यांना वीज चालू बंद करण्याचे अधिकार असतानाही काही कंत्राटी कर्मचारी व गावातील नागरिक ही परमिट नसताना वीज चालू बंद करीत आहेत. दिवस दिवस लाईट बंद करून आणि रात्री वीज बंद पडली तरी कोणीही चालू करायला येत नाहीत. संबंधित कार्यालयाचे अधिकारी श्री. परीट यांना फोन केला तरी ते अजिबात फोन घेत नाहीत आणि सामान्य नागरिकांची ग्राहकांची हे अधिकारी पिळवणूक करीत आहेत.
सध्या गावात अतिरिक्त रोहितची गरज आहे ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी त्यांना तसे कळूनही याबाबत कसलीही कार्यवाही केली नाही तसेच गावातील पोल व त्यावरील तारा लोंबकळत असलेल्या ताराची दुरुस्ती कित्येक वर्षापासून झालेली नाही, गावातील ग्रामस्थांना वेगवेगळे उत्तर कर्मचारी देतात .त्यामुळे ग्राहक यांना वीज सेवा मनावी तशी उपलब्ध होत नाही. रात्री 10 नंतर दोन फेज लाईट जाते त्यामुळे निम्मे गाव अंधारात राहते.
यामुळे पिठाची गिरणी इतर लहान सहान घरगुती उद्योग बंद ठेवावे लागत आहेत. उपकेंद्रामध्ये पूर्णपणे कर्मचारी नाहीत त्यांची ही भरती व्हावी महावितरण चे अधिकारी कोणत्या अधिकारात हे चुकीचं काम करतात हे आपण तातडीने पहावे अशी विनंती करण्यात आली आहे .अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून आपणास कोणतेही पुर्व सुचना न देता कोणत्याही तारखेस रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. याची गंभीर पणे दखल घ्यावी.. संबंधित पञावर सरपंच प्रतिनिधी भास्कर भांगे व गावातील अनेक नागरिक यांच्या सह्या आहेत..