रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेलफेअर संस्थेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने समाजातील गुणवंत, नामवंताचा सत्कार करण्यात आला. यात कलर्स मराठी चॅनलवर आपल्या स्वराची जादू सादर करणारे सोहिल सादिक मुलाणी, महसुल विभागात पदोन्नती प्राप्त नायब तहसीलदार पदी विराजमान झालेले बाबासाहेब गायकवाड, प्रकाश मुसळे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा समन्वयक आर. आर. पाटील, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, शीघ्र कवी खलील शेख, लेखन व भाषण कौशल्य प्राप्त आवेज शकूर शेख तसेच करमाळा येथील आदर्श पत्रकार आशपाक सय्यद, सुयोग झोळ, नानासाहेब पठाडे, शंभुराजे फडतरे, सचिन जव्हेरी, आण्णा काळे, अशोक मुरूमकर, विशाल घोलप, नागेश चेंडके, अलिम शेख, दिनेश मडके, दस्तगीर मुजावर अशा नामवंत व्यक्तींचा सन्मानपत्र संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष हाजी कलिम अ.रशिद काझी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब शेख हे होते. याप्रसंगी बोलताना ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड. बाबूराव हिरडे म्हणाले की, रहेनुमा ट्रस्टचा अभिनव उपक्रम सर्वसामावेशक समाजातील नामवंत गुणवंतांचा सन्मान की, ज्यामुळे नवयुवकांना प्रोत्साहन, ऊर्जा, शब्बासकीची थाप मिळते. तेव्हा त्यांचे काम अधिक पारदर्शक व गतीमान होते. यातून नवीन पिढ्यांना एक आदर्श मिळतो. तेव्हा असे वैचारीक बैठका समविचारी कार्यकर्त्यांच्या विचारातून होणे गरजेचे आहे. आणि हेच कार्य कार्य काझीर करीत आहेत.
यावेळी ॲड. योगेश शिंपी, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा समन्वयक आर. आर. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी शीघ्र कवी खलील शेख यांनी आपली मार्मिक कविता सादर केली. सोहिल मुलाणी व सादिक मुलाणी यांनी गीतगायन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बहुजन विकास संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष इसाक पठाण यांनी केले. उपस्थितांचे आभार भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष कय्यमु शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहेनुमा सोशल बचत गटाचे खजिनदार मुबीन बागवान, बहुजन विकास बचत गटाचे अध्यक्ष जमीर मुलाणी, फुरकान काझी, अमीर शेख, गुलाम सय्यद, समीर बागवान, चेतन ढाळे, इलाही आत्तार, भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, मधुकर मिसाळ, दिनेश माने, दिनेश दळवी, योगेश नराळे, अरूण माने, भिमराव कांबळे, विनोद हरिहर, दिपक भोसले, अमीन बेग, शरीफ दारूवाले, रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे, अजिम मोगल, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लावंड, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, सुहास ओहोळ, स्वराचे मास्टर सादिक मुलाणी, चाँद शेख, शौकत शेख, यासीन शेख, जाफर घोडके उपस्थित होते.
