आपल्या गावाकडील नवोदितांनी मिळविलेल्या यशाला दाद देण्यासाठी नागराज मंजुळेनी दिली 'मदार'  चित्रपटाच्या टीमला भेट - Saptahik Sandesh

आपल्या गावाकडील नवोदितांनी मिळविलेल्या यशाला दाद देण्यासाठी नागराज मंजुळेनी दिली ‘मदार’  चित्रपटाच्या टीमला भेट

करमाळा (संदेश प्रतिनिधी): आपल्या गावाकडच्या  नवोदित कलाकारांनी केलेल्या कामगिरीला दाद देण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘मदार’ या चित्रपटाच्या टीमला भेट देत शुभेच्छा दिल्या.

२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ या पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत, ‘मदार’ हा चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केला आहे. सामाजिक विषय हाताळलेल्या या चित्रपटात करमाळा शहरातील अमृता अग्रवाल हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. इतर कलाकार आदिनाथ जाधव, पांडुरंग राऊत, आजिनाथ केवडे,बलदोटा हे देखील करमाळा तालुक्यातील घोटी गावचे आहेत. मदार हा संपूर्ण चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी, करमाळा शहर व केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे

या भेटीत नागराज मंजुळे यांनी मदार चित्रपटाचे कौतुक करत, चित्रपटातील विविध कलाकारांशी बातचीत केली तसेच मार्गदर्शन केले. यावेळी दिग्दर्शक मंगेश बदर यांनी देखील नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

मदार या चित्रपटाने पटकावलेले पुरस्कार खालील प्रमाणे…
महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ – मंगेश बदर – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता अगरवाल – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता – मिलिंद शिंदे – मदार
– अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर – आकाश बनकर आणि अजय भालेराव – मदार

जेष्ठ अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते अमृता हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेली अमृता ही करमाळ्यातील ‘हॉटेल राम भरोसे’चे उमेश आगरवाल यांची कन्या असून भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या छोट्या भगिनी आहेत.

मदार चित्रपटाच्या कलाकारांची प्रतिक्रिया

At the 21st Pune International Film Festival, the film ‘Madar’ won five awards including the ‘Sant Tukaram Best International Marathi Film’ award, ‘Madar’ was directed by Mangesh Badar, a son of Ghoti village in Karmala taluka | Nagraj Manjule visited the team of the film ‘Madar’ to appreciate the success achieved by the newcomers from his village | saptahik sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!