शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मधे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – येथील शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मधे सावित्रीबाई फुले व बालिका दीन उत्साहात साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सचिव रेणुका काळे मॅडम व छोट्या सावित्रिंच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मुलींनी भाषणे केली यामधे श्रेया कोंडलकर,प्रगती कोंडलकर, स्वरा कोंडलकर, स्वरा सुरवसे, प्रणिती सुरवसे, प्रगती सुरवसे,मनवा सुरवसे, उर्जिता तळेकर, सृष्टी काळे, स्वरा भिलार, साक्षी दुधे, स्वरा आरकीले,संस्कृती घाडगे, प्रांजल दुर्गुळे, देवश्री पारखे, , ऊर्जीता तळेकर, शिवण्या तळेकर,श्रावणी सपाटे, नंदिनी सपाटे, आरोही सपाटे,आरोही तळेकर, रेवती तळेकर व कोडलिंगे इत्यादी मुलींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा परिधान केली होती, सारिका आवाळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन माधुरी घनवट मॅडम यांनी केले यावेळी रेश्मा सुरवसे, वर्षा राऊत आदी उपस्थित होते यावेळी वेशभूषा परिधान करून आलेल्या मुलींना संस्था अध्यक्ष सुहास काळे सर यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!