शेळकेवस्ती (दहिगाव) शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आज (दि.३) असलेल्या जयंती दिनानिमित्ताने करमाळा तालुक्यातील शेळकेवस्ती (दहिगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चेअरमन सौ राहीबाई शेळके, नूतन सरपंच सौ प्रियंका गलांडे व आरोग्य सेविका सौ.निर्मळ या उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व स्त्रीशिक्षणाचे महत्त्व या विषयावर विचार प्रगट केले.
या कार्यक्रमासाठी शाळा परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये अनुराधा शेळके, इंदूबाई मोटे, मेघा शेळके, स्वाती शेळके, हरिश्चंद्र शेळके संजूदादा गलांडे महेशबापू शेळके हणू टकले,नारायण मोटे आदीजन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राऊत सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक दस्तगीर शेख यांनी मानले.