राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथे आज (ता.३) श्री राजेश्वर विद्यालय राजुरी प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बनवला जावा, यासाठी श्री राजेश्वर विद्यालयाच्या मैदानावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे विज्ञान विषय शिक्षक अमोल कोल्हे यांच्या हस्ते करून सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राजुरी ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी श्री राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सोपान झोळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी चे मुख्याध्यापक संतोष शितोळे, तुळशीराम जगदाळे, सोमनाथ पाटील, अंकुश सुरवसे, रत्नाकर तळेकर, विद्या कोल्हे-तळेकर, विजय गरड, गंगाराम वाघमोडे, जगन्नाथ अवघडे, कल्याण बागडे आदी मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती साखरे यांनी केले.
