वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सयाजीराजे ओंभासे यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक नेते सयाजीराजे केशव ओंभासे सर यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाद्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
श्री ओंभासे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सामाजिक कामाचा ठसा तालुक्यात आणि जिल्ह्यात उमटवला आहे. सर्व समाजातील गोरगरीब कुटुंबातील गुणवंत विध्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे, सामुदायिक विवाह सोहळ्यास मदत, गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन करणे, वृक्षारोपणा-वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करणे,करोना साथीच्या काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून रुग्णांना मदत करणे इत्यादी सामाजिक कार्यात त्यानी आपल्या कामाची मोहोर उमटवली आहे.
त्यांच्या कार्याची दखल राज्य पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांची निवड केली आहे.सदर ची निवड ही वंजारी महासंघाचे राज्यध्यक्ष गणेश खाडे, राज्य संपर्कप्रमुख खंडेश्वर मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, वंजारी महासंघ शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य चे विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब बुधवंत उपस्थित होते.
याशिवाय याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी चे माजी संचालक देवेंद्र जाधवर,शिक्षक संघाचे सरचिटणीस अमृत सोनावणे, संजय मुंडे, दादासाहेब बुधवंत,शिक्षक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधवर, शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार खाडे, संदीप ढाकणे, अशोक मुंडे,उद्योजक श्री श्रीराम बिनवडे, श्री भागवत गर्जे,ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ सखाराम गर्जे, डी जी पाखरे, किरण सानप, रामहरी जाधवर, श्री श्रीमंत हांगे, श्री कमलाकर सांगळे,श्री सुदर्शन केकाण, जेष्ठ मार्गदर्शक मछिंद्र बिनवडे,सौ वनिता बडे, सौ उषा ओंभासे, सौ उगलमोगले, सौ जाधवर या प्रसंगी उपस्थित होते. सयाजीराजे ओंभासे यांचे निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.