नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये पालकांचा विद्यार्थ्यांसोबत उपक्रमात सहभाग.. - Saptahik Sandesh

नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये पालकांचा विद्यार्थ्यांसोबत उपक्रमात सहभाग..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये पालकांनी मुलासोबत उपक्रमाचा आनंद घेतला. फॅमिली फोटो फ्रेम बनवण्याबाबत हा उपक्रम घेण्यात आला.हा उपक्रम नर्सरीतील मुलांसाठी घेण्यात आला होता.

मोठेपणी आपण आपले बालपण विसरलेलो असतो. तेच बालपण आपण आपल्या मुलांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आठवणींना उजाळा मिळाला म्हणून पालक वर्ग ही खुश होता तर आपल्या पालकांसोबत आपण उपक्रम करत आहोत म्हणून बालवर्गही खुश होता. याप्रसंगी बऱ्याच पालकांनी आपला सहभाग नोंदवला. बनवलेल्या फोटो फ्रेम चे शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनिता देवी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते यांनी कौतुक केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!