खडकेवाडी येथील तुषार शेळके यांची अन्न सुरक्षा अधिकारीपदी निवड
करमाळा(दि.२३): खडकेवाडी (ता.करमाळा) येथील तुषार पांडुरंग शेळके यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमधून अन्न व औषध प्रशासन या विभागात अन्न सुरक्षा अधिकारी (राजपत्रित अधिकारी) पदासाठी निवड झाली आहे.
श्री.शेळके हे सध्या रेल्वे विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सोबत स्पर्धा परीक्षा द्यायचे त्यांचे चालू होते. त्यांच्या या निवडीनंतर त्यांचे खडकेवाडी परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
अन्नाची गुणवत्ता व भेसळ रोखण्यासाठी कोठेही झडती घेणे,साठा जप्त करणे, वॉरंट काढणे, खटला चालवणे इत्यादी अधिकार अन्न सुरक्षा अधिकार यांना प्राप्त आहेत. तसेच FSSAI तर्फे देण्यात येणाऱ्या अन्न व पेय यासाठी लागणाऱ्या लायसेन्स प्रक्रियेमध्ये अन्न सुरक्षा मानके कायदा -२००६ नुसार तपासणी व कारवाई करण्याचे अधिकार व जबाबदारी या पदावर असते.