करमाळा वकिल संघातर्फे वरीष्ठ स्तर न्यायाधीश श्री.घुगे यांचे स्वागत..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील दिवाणी वरीष्ठ न्यायालयातील न्यायाधीश मीना एखे या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्यानंतर येथील वरीष्ठ स्तर न्यायालयात न्यायाधीश एस.एम. घुगे यांनी अधिभार स्विकारला आहे. त्यांचे आगमन झाल्यानंतर आज (ता. ११) करमाळा वकिल संघा तर्फे त्यांचे स्वागत वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.रविंद्र बरडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.पी. कुलकर्णी या उपस्थित होत्या. वकिल संघाचे उपाध्यक्ष ॲड. सुनील रोकडे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.लताताई पाटील यांनी न्यायाधीश कुलकर्णी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. जयदीप देवकर यांनी केले. तर आभार ॲड. कमलाकर वीर यांनी मानले. यावेळी वकिल संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





