शाहूदादा फरतडे यांची शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख पदी निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा येथील शाहूदादा फरतडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
नागोबाचे हिवरे हे फरतडे यांचे मुळ गाव असून शाखा प्रमुख विभाग प्रमुख, उप तालुकाप्रमुख,तालुकाप्रमुख या पदावर त्यांनी काम केले असुन आजवरचे संघटना वाढीसाठीचे योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्याना उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे.
या निवडीचे केम येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री हरि भैय्या तळेकर माजी उपतालुकाप्रमुख उत्तरेश्वर तळेकर प्रसिद्ध प्रमुख आवीनाश तळेकर, शहर प्रमुख सतीश खानट उत्तरेश्वर गोडगे रमेश तळेकर अनिल तळेकर युवा सेनेचे तालुका समन्वयक सागर राजे तळेकर महादेव पळसकर शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षा चव्हाण शहर प्रमुख सौ आशा मोरे , नवनाथ देवकर सामाजिक कार्यकर्ते राहुल आबा कोरे यांनी अभिनंदन केले आहे



