केम येथे शिवजयंती पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात

केम(संजय जाधव) : केम येथे शिवजयंती निमित्त राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. या निमित्त सकाळी आठ वाजता शिवसंभो वेशीवरिल राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. सजवलेल्या पालखीत शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
या पालखी सोहळ्यात वीट येथील हालगी,पुठ्ठा,संबळ वाद्य, तसेच तरुणांनी हातात भगवे झेंडे घेतलेले होते. या पालखी सोहळ्यात श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल, शिवक्रिती इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते. श्री उत्तरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीम खेळले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती.
या सोहळ्याची मिरवणूक तब्बल चार तास चालली पालखी सोहळा वेशीवर आल्यानंतर पालखीचे पुजन करून सांगता झाली त्यानंतर आलेल्या हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठया संख्येने शिवभक्त उपस्थित होते.






