श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के — मुलींचीच बाजी

केम (संजय जाधव): निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निकालात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकावत यशाची बाजी मारली आहे.

या विद्यालयातून कु. दिव्या परमेश्वर मारकड हिने ९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक,कु. श्रद्धा रामा वाघमारे हिने ९०.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. प्रियांका सचिन कांबळे हिने ८९.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन श्री. अरुण तळेकर, मुख्याध्यापक श्री. एस. जे. व्यवहारे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

विद्यालयाने गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा टिकवली असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे निंभोरे परिसरातून विद्यालयाचे भरभरून कौतुक होत आहे.




