राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत सुयश - प्रिया चेंडगे प्रथम -

राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत सुयश – प्रिया चेंडगे प्रथम

0

केम(संजय जाधव): येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाचा दहावीचा निकाल खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला असून रेग्युलर विद्यार्थ्यांचा निकाल ९७.१४ % लागला आहे. यामध्ये मुलींनी आघाडी घेतली असून, प्रिया चेंडगे हिने ९३ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी जाधव (८८%) व प्राजक्ता मोटे (८४%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर, सचिव व मुख्याध्यापक विनोद तळेकर, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर यांच्यासह शिक्षकवृंदांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!