गौंडरेच्या धर्मवीर संभाजी विद्यालयातील ९६% विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला आहे. या विद्यालयातून एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

प्रथम तीन क्रमांकांचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
- गायकवाड विक्रमादित्य नवनाथ — ९१.६०% (प्रथम क्रमांक)
- पारेकर धनश्री अनिल — ९१.३०% (द्वितीय क्रमांक)
- रोकडे प्रतिक्षा दादासाहेब — ८९.६०% (तृतीय क्रमांक)

या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बापू नीळ, तसेच दहावी वर्गाचे शिक्षक यशवंत वामन कोळेकर, हरिदास काळे, वैजिनाथ भोईटे, सुखदेव गिलबिले, अशोक जावळे, इंद्रजित मुळीक, उत्तम हनपुडे, संतोष पुराणे आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.




