नूतन विद्यालयाची सायली केम केंद्रात प्रथम – विद्यालयाचा ८५% निकाल

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. या विद्यालयातील कुमारी सायली सुहास बिचितकर हिने केम केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला असून तिला ९६ टक्के गुण मिळाले आहेत.
कुमारी समृद्धी धनराज बिचितकर हिने विद्यालयात दुसरा क्रमांक (८८.६० टक्के) मिळवला, तर कुमारी संस्कृती आपा पारखे हिला ८७.८० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन श्री. सुदर्शन तळेकर, सचिव भाऊसाहेब बिचितकर, मुख्याध्यापिका सौ. ताक मोगे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यालयाने केम केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून परिसरात नावलौकिक मिळवला असून सर्वत्र विद्यालयाचे कौतुक होत आहे.





