वांगी नं १ येथील शुभम देशमुखची राज्य कर निरीक्षकपदी (STI) निवड

केम(संजय जाधव):वांगी नं १ (ता.करमाळा) येथील शुभम हैबतराव देशमुख या युवकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य कर निरीक्षकपदी (STI) निवड झाली आहे.
पदवीच्या अभ्यासक्रमानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची पूर्णवेळ तयारी सुरु केली होती. विविध परीक्षेतील प्रयत्नानंतर यंदा त्याला राज्य कर निरीक्षक परीक्षेत यश मिळाले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुभम हा धनुर्विद्या खेळात पारंगत असून त्याने या आधी विविध स्तरावर यश मिळवले आहे.







 
                       
                      