स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न

केम(संजय जाधव) : स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेहसंमेलन अविष्कार 24-25 उत्साही वातावरणात संपन्न झाले. करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी-वस्ती वरील सामान्य कुटुंबातील चिमुकले कलाकारांनी देशभक्ती,पारंपारिक गीते,,लोकगीते,मराठी-हिंदी चित्रपट गीते यावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस गणेशजी चिवटे ,यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, साहित्यिका डॉ अंजली श्रीवास्तव मँडम, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी, ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा माधुरी परदेशी, माजी मुख्याध्यापिका नलिनी पुंडे,भाजपाचे नरेंद्र सिंह ठाकुर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरूण टांगडे, सोशल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश मडके, माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष विशाल परदेशी,साडे स्कूलचे ढवळे सर, दळवी मँडम, स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी,मंजुळा वाघमारे, सुमन दळवी, सुलोचना दळवी,करमाळा तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मँडम यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस उपनिरीक्षक चंदनशिव, साहित्यिका श्रीवास्तव,करे पाटील ,लावंड सर यांनी मनोगत व्यक्त केले होते स्कूलच्या सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, अश्विनी महामुनी, अश्विनी पाटील,रोहीणी गरड, त्रिवेणी दळवी, सविता पवार, सायली दळवी, कृष्णा पवार, आसिफ मणेरी सर्व टिचर्स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे पालक वर्ग श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले होते.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात असाच भाग घेत राहावे सर्वांगीण गुण त्यांच्यात असणे आता काळाची गरज आहे भविष्यात कलाकार घडु शकतात स्नेहालय परिवाराकडून कला गुणांना वाव मिळत आहे शाळेची प्रगती होत आहे
● संदेश चंदनशिव, पोलीस उपनिरीक्षक, करमाळा

संस्थेचे संस्थापक जयंत दळवी व धनश्री दळवी मॅडम यांच्यामुळे स्नेहालय स्कूल प्रगतीपथावर आहे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे विद्यार्थी्यांना त् चांगले शिक्षण मिळावे यासाठी आमच्या संस्थेमार्फत स्नेहालय स्कूलला स्मार्ट टीव्ही भेट देत आहोत.
● गणेश करे-पाटील, अध्यक्ष यश कल्याणी संस्था, करमाळा
स्नेहालय इंग्लिश स्कूलचा १० वर्षाचा हा यशस्वीतेचा पल्ला गाठणं खरंच सोपं नव्हतं पण धनश्री दळवी,जय़ंत दळवी आणि स्नेहालय स्कूलच्या सर्व शिक्षकांनी हे पूर्ण केलं.शिक्षण,कलागुण आणि स़ंस्कारानं परिपूर्ण असलेल्या या शाळेचं खरंच मनापासून कौतुक.
आरटीई कायदा अंतर्गत ही ते वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देतात याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
● अंजली राठोड-श्रीवास्तव, साहित्यिक/सामाजिक कार्यकर्त्या
आपल्या विद्यालयास नर्सरी ते बारावी आर्ट, काँमर्स, सायन्स मान्यता मिळाली आहे दहा वर्षे पूर्ण झाली आहे विद्यार्थ्यांकडे वैयक्तीक मार्गदर्शन,वर्गात मर्यादित विद्यार्थी प्रशस्त इमारती समोरील असलेले भव्य क्रिडांगण सी सी टी व्हीची नजर, स्वयंशिस्त, स्वच्छता व संस्कार या गोष्टीवर विशेष लक्ष दिले जाते. C.B.S.C.पॅटर्ण नुसार सुरु असलेले व शहरी व ग्रामीण भागातील पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षक, योग्य मॅनेजमेंट मुळे स्नेहालय स्कूलचे नाव लौकिकास पात्र झाले आहे – ● धनश्री दळवी, मुख्याध्यापिका, स्नेहालय स्कूल, करमाळा






