अस्थी नदीत न सोडता वृक्षारोपण करून तळेकर परिवाराने दिला सामाजिक संदेश
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम येथे
नुकतेच पार्वती दत्तात्रय तळेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी वाहत्या पाण्यात, नदीत विसर्जित न करता आपल्याच शेतात पुरून त्यावर वृक्ष लागवड करून एक नवा सामाजिक संदेश गो सेवक परमेश्वर दत्तात्रय तळेकर व त्यांच्या परिवाराने दिला आहे.
केम येथे पूर्वापार अस्थी नदीला सोडण्याची प्रथा आहे. या मुळे नदी प्रदूषित होत असल्याने अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत व तो बदल आपल्यापासून करायचा असे ठरवून तळेकर परिवाराने अस्थी नदीला सोड न देत काळया आईचे ओटीत पुरून त्यावर वृक्ष लागवड केली.
तळेकर कुटुंबाने अतिशय चांगला परिवर्तनवादी निर्णय घेतला आहे त्याचे मी स्वागत करतो. अस्थी विसर्जित करून नदी प्रदूषण होते. जे पाणी आपणच पिणार असतो. अस्थी शेतात पुरून वृक्षरोपण केले त्यामुळे ती झाडे त्यांच्यासोबत कायम राहतील व त्यांची सावली म्हणून साथ देतील व त्या झाडाकडे ते ज्या वेळेस पाहतील त्यावेळेस त्यांना त्यांच्यामध्ये गेलेला माणूस दिसेल. – सचिन अशोक काळे, मराठा सेवा संघ, केम