आ.संजयमामा शिंदे यांनी वांगीत केला नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार - Saptahik Sandesh

आ.संजयमामा शिंदे यांनी वांगीत केला नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
करमाळा :
वांगी नं १ (ता.करमाळा) येथे काल (ता.७) सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या वांगी नं1 वांगी नंबर 2 नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख , चिखलठाण चे सरपंच चंद्रकांत सरडे , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , तानाजी झोळ , विलास पाटील , रोहिदास सातव , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, राजेंद्र धांडे , डॉ . गोरख गुळवे , शंकर कवडे , सुहास रोकडे , सचिन देशमुख , अशोक तकिक , सुजित बागल , तात्या सरडे , प्रवीण शिंदे गुरुजी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते वांगी नंबर 1 येथील नुतन ग्रामपंचायत सदस्य हरिदास तकीक , विठाबाई भोसले , अमोल दैन , सोमनाथ ढावरे , सुरेखा दिवटे , नरसिंग देशमुख , शुभांगी देशमुख वांगी नंबर 4 येथील आबासाहेब राखुंडे , सविता सुळ , गितांजली देशमुख वांगी नंबर 2 येथील सुवर्णा भानवसे , विलास ढाणे , सोनाली तकीक , सुरेश जाधव , पुजा चौधरी वांगी नंबर 3 येथील सुवर्णा कांबळे , शंकर जाधव , चंद्रकांत कदम , मयुर रोकडे , रोहिणी रोकडे या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Yash collection karmala clothes shop

यावेळी बोलताना आ.संजयमामा शिंदे म्हणाले की, आपण मतदारांनी ज्या विश्वासाने तालुक्याची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण काम करणारा असून येत्या काळात वीज, रस्ते या पश्चिम भागातील महत्त्वाच्या विषयावरती आपण काम करणार असून त्याचे रिझल्ट आपल्याला भविष्यात निश्चितच दिसतील आपणही या विकासाच्या प्रक्रियेचे सहभागी व्हा व सहकार्य करा असे आवाहन त्यांनी उपस्थित सदस्यांना केले.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!