विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनविले आकाशकंदील व विविध वस्तू – नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये दिपावली उत्सव साजरा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार मध्ये दीपावली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आकाश कंदील तसेच फुलांच्या माळा , रांगोळी याने सजावट करण्यात आली होती. विशेष करून सजावटीसाठी लागणारे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवले होते. विद्यार्थी ही रंगबिरंगी कपड्यांमध्ये आले होते. त्यामुळे एकूणच शाळेचे वातावरण उत्साहाचे व आनंदाचे झाले होते.
सर्वत्र दीपावली हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अज्ञानाकडून ज्ञानाकडे ,तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा दीपावलीचा उत्सव असतो. याप्रसंगी शाळेच्या इमारतीची साफसफाई व सजावट करण्यात आली होती. शाळेचे अध्यक्ष कन्हैयालालजी देवी सर संचालिका सुनीता देवी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी संचालक विजयकुमार दोशी ही उपस्थित होते . त्यांनी मुलांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते यांनीही शाळेतील सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले. या उत्सवामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी आपला सहभाग नोंदवला.