वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना १०% लाभांश वाटप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वांगी (ता.करमाळा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही करमाळा तालुक्यातील एकमेव अशी संस्था आहे की, या संस्थेच्या ठेवी २ कोटी ८५ लाख रूपये इतक्या आहेत, संस्थेच्यावतीने लाभांश रक्कम १३,८५,८४३/- इतकी लाभांश रक्कम वाटप करण्यात आली सदर प्रसंगी मान्यवरांसह सभासद शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संस्थेचे कर्ज वाटप 5 कोटी इतके आहे, संस्थेची स्वमालकीची दोन मजली इमारत असून संस्थेचे १७०० सभासद आहे सलग 15 वर्षे बॅन्क पातळीवर १००% इतकी वसुली आहे, याप्रसंगी शहाजीराव देशमुख, (मा,व्हा.चेअरमन आदिनाथ कारखाना) करमाळा बाजार समितेचे सभापती शिवाजीराव बंडगर, आदिनाथ कारखाना संचालक पांडुरंग जाधव, मकाई सहकारी साखर कारखाना संचालक संतोष देशमुख, भारतराव साळुंके,मा. चेअरमन साहेबराव रोकडे , मा पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, ग्रामपंचायत वांगी नंबर 3 चे सरपंच मयुर रोकडे, उपसरपंच संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी गोरख भोसले, लक्ष्मण दादा महाडिक, जलालभई पटेल, युवराज रोकडे,गणेश तळेकर अर्जुन तकीक रामेश्वर तळेकर संस्थेचे चेअरमन विजय रोकडे,व्हा. चेअरमन भैरवनाथ बंडगर , संचालक सर्वश्री दिनकर रोकडे,नानासाहेब भानवसे ,रविराज देशमुख ,विकास पाटील, उमेश पाटील, अप्पासाहेब भोसले,नागनाथ मंगवडे,नामदेव महाडीक, भाऊसाहेब गोडसे,भाऊसाहेब शेळके, मंगल जाधव सौ साधना मंगवडे ,तानाजी देशमुख , राव काका देशमुख,नितीन देशमुख ,सुखदेव सातव देविदास तळेकर, पांडुरंग तकिक ऋषिकेश रोडे नागनाथ जाधव उपस्थित होते, याप्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय शिर्के भाऊसाहेब यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला त्यानंतर आदिनाथ चे माजी व्हा चेअरमन माननीय श्री शहाजीराव देशमुख सर व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय श्री शिवाजीराव बंडगर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भैरवनाथ बंडगर यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री अर्जुन आबा तकिक यांनी केले याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.