राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कंदरच्या सोहमराजचे सुयश

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये कंदर येथील कण्वमुनी विद्यालयातील खेळाडू सोहमराज जगन्नाथ मोरे याने सतरा वर्षे वयोगटांमध्ये व ७१ किलो वजन गटांमध्ये ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) मिळवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळविले.

त्याला क्रीडा शिक्षक बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मिळवलेले यशाबद्दल संस्थेचे संस्थापक शंकरराव भांगे संचालक नवनाथ भांगे सचिव सुनील भांगे प्राचार्य सौ कदम एस एन पर्यवेक्षक वल्लाळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच केंद्रप्रमुख साईनाथ देवकर गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी अभिनंदन केले आहे त्याचे कंदर परिसरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!