चिवटे बंधूच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचा माहोल सुरू : ॲड.बाबूराव हिरडे - Saptahik Sandesh

चिवटे बंधूच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचा माहोल सुरू : ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : राज्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांचे तर शिवसेनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात महेश चिवटे या दोघा बंधूंच्या माध्यमातून विकासाचा माहोल सुरू आहे; असे मत ज्येष्ठ पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या वतीने २२७ बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप ॲड. हिरडे यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, सामाजिक कार्यकर्ते भरत वांगडे, पत्रकार अशोक नरसाळे, नाशीर कबीर, जयंत दळवी, विशाल परदेशी, नागेश शेंडगे तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे, शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, उपतालुका प्रमुख दादासाहेब थोरात, शहरप्रमुख नागेश गुरव, शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, निलेश चव्हाण यांचेसह शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे उपस्थित होत्या.

पुढे बोलताना ॲड.हिरडे म्हणाले की, राजकारणाच्या जाग्यावर राजकारण असावं, पण राजकारणातून समाजकारण कसं करावं व सर्वसामान्यांची सेवा कशी करावी, हे चिवटे बंधूकडून शिकण्यासारखे आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं ही महत्वाची गरज आहे. दलालाची साखळी मोडून या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचे आहे. हे काम आता अधिक गतिमान झाले आहे.

यावेळी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महेश चिवटे यांचा सत्कार तालुका पत्रकार संघाच्या वतीने ॲड. हिरडे, अशोक नरसाळे, नासीर कबीर, जयंत दळवी, नागेश चेंडगे, विशाल परदेशी यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, अंगणवाडी सेविका सौ.इंगळे यांचेसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे आदींची भाषणे झाली.

शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात दोन हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना प्रत्यक्षात लाभ दिला आहे. याशिवाय त्यांच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती व घरकुल मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ज्या व्यक्तींना लाभ मिळाला आहे, त्या व्यक्तींनी इतरांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा; आम्ही त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. 

महेश चिवटे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!