‘कमलाई’ वीटभट्टी असोसिएशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी सुधाकर लावंड तर उपाध्यक्षपदी सुनिल सावंत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कमलाई वीटभट्टीधारक असोसिएशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी सुधाकर (काका) लावंड यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी सुनील (बापू) सावंत यांची निवड करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील वीटभट्टीधारक यांनी एकत्र येऊन कमलाई वीटभट्टीधारक असोसिएशनची स्थापन करून रजिस्ट्रेशन केले आहे. असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी तालुका अध्यक्ष पदी सुधाकर लावंड व तालुका उपाध्यक्ष पदी सुनील सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सचिव पदी नागेश (बापू) जाधव, खजिनदार पदी जातेगाव येथील पै.दत्तात्रय शिंदे यांची तर सदस्य पदी राहूल परदेशी, राजेंद्र कुंभार, उत्तम कुंभार, प्रकाश पारखे (कोर्टी), पप्पू जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला भाऊसाहेब करगळ, तबरेश सय्यद, नामदेव कांबळे, देवा लोंढे, अक्षय कुंभार, राहूल कुंभार, संभाजी माने, संताजी कोकरे, सागर काळे, ज्ञानदेव नायकुडे, गणेश जाधव, गुलाम सय्यद, प्रविण पालवे, पोपट कारंडे, अतुल कुंभार, अक्षय कुंभार, सोनू कुंभार आदीजण उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील वीटभट्टीधारकांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार; असे आश्वासन नूतन अध्यक्ष सुधाकर लावंड व उपाध्यक्ष सुनील सावंत यांनी दिले.