चिखलठाण येथे ५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर - Saptahik Sandesh

चिखलठाण येथे ५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण १ (ता.करमाळा) येथे ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा; असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले.

याबाबत माहिती देताना बारकुंड म्हणाले, की रक्तदानाची सध्या सर्वत्र गरज आहे. त्यामुळे युवकांनी स्वयंफुर्तीने पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. आमदार शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून चिखलठाण येथील जाणता राजा गणेश मंडळ याचे सहकार्याने ५ ऑगस्टला विठ्ठल रुक्मीणी मंदिर येथे १० ते ५ यावेळेत रक्तदान शिबीर होणार आहे. शिबीराचे उद्घाटन माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे हस्ते होणार आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारकुंड यांनी केले आहे.

Yash collection karmala clothes shop
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!