श्रावण मासानिमित्त कंदर येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह - Saptahik Sandesh

श्रावण मासानिमित्त कंदर येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

हरिनाम सप्ताह संग्रहित छायाचित्र…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : कंदर (ता करमाळा) येथे श्रावण मासानिमित्त आज (ता.४) गुरुवार ते बुधवार 10 ऑगस्ट या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता ह भ प बाळासाहेब भोसले महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण ग्रंथ पूजन विना पूजन करून नाम सप्ताहास सुरुवात होईल.

यामध्ये ह भ प मनोज शहा तुलसीकर कल्याण सरडे सांगवी, सदाशिव माने कंदर, नंदू तात्या कुलकर्णी निंभोरे, काकासाहेब भोसले कंदर, बिबीशन रणदिवे अरण यांची प्रवचने होणार आहेत. तसेच ह भ प राजेंद्र रनवरे, शिंदेवाडी दीपक देशमुख अकोले इंदुरीकर अंकुश रणखांबे मधुकर गिरी नान्नज हनुमंत मारकड कात्रज पंडित कोल्हे निफाड नाशिक यांची कीर्तने होणार आहेत, तसेच बुधवार 10 रोजी सकाळी सकाळी सात ते आठ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आठ ते दहा या वेळेत दिंडी प्रदक्षिणा आणि मिरवणूक दहा ते बारा या वेळेत ह भ प बाळासाहेब भोसले महाराज कंदरकर यांचे काल्याचे किर्तन होईल, तरी या नाम सप्ताहाचा कंदर परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!