शालेय ज़िल्हा योगासन स्पर्धेत स्वामींनी संतोष पोतदार प्रथम..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ज़िल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे संपन्न झालेल्या शालेय ज़िल्हा योगासन स्पर्धेत सोलापूर ज़िल्हातुन विविध शाळातील 200 योगासन खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यात करमाळ्याच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला, यात 14 वर्षाखालील मुलीमध्ये आर्टिस्टिक योगासन मध्ये कु.स्वामींनी संतोष पोतदार हिने प्रथम मिळवला आहे.
कु.पोतदार ही कर्मवीर आण्णासाहेब जगताप विदयालयात इ ६वी मध्ये शिकत असून तिच्या या यशामागे योगासनाचे विशेष मार्गदर्शन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे योग प्रक्षिशक सागर शिरस्कर, सानिका भगत, अजय बालशंकर, क्रिडा शिक्षक ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्षे झाली योगासनाचा सराव करत आहे.
स्वामींनी संतोष पोतदार हिचे विशेष अभिनंदन करमाळा तालुका क्रीडा अधिकारी तानाजी मोरे , मुख्याध्यापक कांबळे सर , यश कल्याणीचे गणेश करे-पाटील , प्राचार्य मिलिंद फंड, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटिलसाहेब , नगरसेवक महादेव फंड , डॉ महेश वीर , नगरसेवक अतुल फंड , जिल्हा शिक्षक पतसंस्था संचालक हनुमंत सरडे , प्राचार्य बाळासाहेब नरारे, सुहास कांबळे , अशोक बरडे, शिवाजी लोकरे , गरजेसर , खारगेसर, सतीष कांबळे , नाना मोहिते, पत्रकार नाना पठाडे यांनी अभिनंदन केले. स्वामींनी पोतदार हीचे आई ,वडील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी या शाळेवर कार्यरत आहेत.
या स्पर्धेतून आगामी नगर येथे होणाऱ्या शालेय विभागीय योगासन स्पर्धेसाठी सोलापूर चा योगासनाच्या संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन ज़िल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर सर यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी सोलापूर ज़िल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे व अधिकृत पंच यांनी सहाय्य केले.वरील सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य क्रीडा अधिकारी नाईकवाडे यांचे होते.