करमाळा नगरपरिषदेच्यावतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा.. - Saptahik Sandesh

करमाळा नगरपरिषदेच्यावतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा नगरपरिषदेच्यावतीने माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत, करमाळा शहरातील दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा, जयवंतराव जगताप बहुउद्देशी सभाग्रह येथे आयोजित केली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन गुंजकर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे अजित रायपुरकर क्ष-किरण वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, रोहन भालेराव, दामोदर परबत, आरोग्य निरीक्षक जब्बर खान, दीनदयाळ उपाध्ये विभागाचे तुषार टंगसाळे हे उपस्थित होते.

डॉ गजानन गुंजकर व अजित रायपुरकर यांचे मार्गदर्शन लाभले, यावेळी प्रास्ताविक मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी केले. सूत्रसंचालन करमाळा नगरपरिषद चे इसाक पठाण यांनी केले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे, संतोष कुंभार,समीर बागवान,भाऊसाहेब आरणे, प्रशांत कांबळे, तानाजी सुरवसे, आसमा कुरेशी, दिलीप किरवे, अक्षरा बोरा, हेमंत शिंदे, संजय मुरकुटे, सत्तार शेख, ज्योतीराम माने, गोरखनाथ जाधव, किशोर कुंभार, सुशील गानबोटे, , बाळासाहेब दीक्षित, निर्मला भुसारे, सुशील वनारसे, उत्तम क्षीरसागर, शुभम कुंभार, वासंती टकले दुर्गा क्षीरसागर, इत्यादीसह बहुसंख्येने दिव्यांग उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा नगर परिषदेचे कार्यालयीन प्रमुख दिगंबर देशमुख, मिळकत विभागाचे गजानन राक्षे, अभय देशपांडे, रावसाहेब कांबळे, राजेंद्र झाडबुके, सुरज मेहतर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार, प्रहार आपंग क्रांती आंदोलन संघटनेचे करमाळा शहराध्यक्ष समीर बागवान यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!