कंदर येथील सय्यद शहानूर साहेब यांच्या यात्रेस आज पासून सुरुवात..

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे..

कंदर (ता.करमाळा) येथील हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक मानले गेलेल्या तथा ग्रामदैवत सय्यद शहानुर साहेब यांच्या यात्रेस आज (ता.१०) पासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा उत्साही व आनंदी वातावरणात साजरी करावी असे आवाहन यात्रा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

या यात्रेत आज रात्री नऊ वाजता संदलची भव्य मिरवणूक निघाली आहे, यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली तसेच उद्या शनिवार (ता.११) हा दिवस यात्रेचा मुख्य दिवस आहे, सायंकाळी ४ वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे, तसेच रात्री ९ वाजता छबिण्याची मिरवणूक होणार आहे.. त्यानंतर रविवार (ता.१२) दुपारी ३ वाजता भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित केले आहे.

यामध्ये कै. प्रतापसिंह शिंदे यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची कुस्ती कंदर येथील नामवंत मल्ल पैलवान अमित जगदाळे विरुद्ध बारामती येथील पैलवान रोहित जाधव यांचेत होणार आहे. बाळासाहेब नवनाथ डोके के डी एक्सपोर्ट यांच्यातर्फे ४१ हजार रुपयाची कुस्ती कंदर येथील पैलवान भैय्या धुमाळ विरुद्ध जेऊर येथील पैलवान प्रदीप बेरे यांच्यात होणार आहे.

जिजामाता फ्रुट सप्लायर भैरवनाथ लोकरे यांच्यातर्फे ३१ हजार रुपयाची कुस्ती कंद‌र येथील पैलवान बबलू सुतार विरुद्ध गार अकोले येथील पैलवान‌ अजय राजमाने यांच्यात होणार आहे. हनुमंत गोडगे यांच्यातर्फे २१ हजार रुपये कुस्ती कंदर येथील पैलवान विशाल लांडगे विरुद्ध‌ जेऊर येथील पैलवान रामा शिंदे यांच्यात होणार आहे.रात्री कवाली चा कार्यक्रम होणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी गुरुवार (ता.१६) रोजी रात्री दहा वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध आर्केस्ट्रा झंकार चा‌ कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!