टेंभुर्णी-केम एसटी बस सेवा आजपासून पुन्हा सुरळीतपणे सुरू
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : मागील दोन महिन्यांपासून बंद पडलेली टेंभुर्णी-केम एसटी बस सेवा आजपासून (दि.२१ नोव्हेंबर) पुन्हा नेहमीच्या वेळेला सुरू झालेली आहे.
ही एसटी बंद असल्याने उपळवटे,सातोली,दहिवली,केम, कन्हेरगांव या भागातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला ये जा करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना कामा निमित्त प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आता बस चालू झाल्याने याचा फायदा संबंधित गावातील नागरिकांना होणार आहे.
ही बस चालू होण्यासाठी उपळवटे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी प्रयत्न केले. घोरपडे यांनी
माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर आ.शिंदे यांनी कुर्डुवाडी बस आगरप्रमुख श्री . राठोड यांना संपर्क साधून टेंभुर्णी-केम एसटी बस सेवा चालू करण्याची विनंती केली.
यानंतर कुर्डुवाडी एसटी आगराकडून टेंभुर्णी-केम एसटी बस सेवा आजपासून (दि.२१ नोव्हेंबर) पुन्हा सुरू करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी केलेल्या या प्रयत्नाचे करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा ताई चव्हाण यांनी कौतुक केले.