करमाळा-माळवाडी-निलज रस्ता मंजूर असून रखडला
समस्या – करमाळा-माळवाडी-निलज हा रस्ता गेले अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्याचा रखडला आहे. या रस्त्यावरून या भागातील अनेक नागरीक, विद्यार्थी रोज करमाळ्याला ये-जा करतात. कच्च्या रस्त्याने सर्वांना ये जा करताना वाहने अतिशय जिकरीने चालवावी लागत आहेत. या रस्त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. दिलेल्या छायाचित्रात आपण रस्त्याची सध्याची स्थिती पाहू शकतो. या रस्ताला निधी मंजूर असल्याचे समजले आहे.तरी देखील हा रस्ता कित्येक वर्षांपासून रखडला आहे. संबंधित विभागाने, अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या भागातील जनतेला दिलासा द्यावा.
प्रश्न मांडणारे – राजाभाऊ काळे, करमाळा