श्री कमला भवानी मातेचे सिमोल्लंघन उत्साहात संपन्न

करमाळा,ता.२: श्रीदेवीचामाळ येथील प्रसिद्ध श्री कमला भवानी मंदिरात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माता कमला भवानीचे पारंपरिक सिमोल्लंघन उत्साहात व हजारो भक्तांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाले.
सायंकाळी सहा वाजता सिंहावर आरूढ झालेल्या कमला भवानी मातेची भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक खंडोबा मंदिरापाशी पोहचताच श्री खंडोबाची पालखीही छबिण्यासोबत वायू वेगाने सिमोल्लंघनासाठी निघाली. या संयोगाने भाविकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.


छबिण्याच्या खांद्याचे मानकरी म्हणून :
श्रीराम फलफले, प्रभाकर दौंडे, विजय चव्हाण, पांडुरंग पवार, अभिमान पवार, अनिल पवार, सतीश अनभुले, नाना बिडवे, अक्षय फलफले, बिभीषण फलफले, प्रभाकर फलफले, ईश्वर दौंडे, बिटू धुरेकर आदी सेवेकरी सहभागी झाले.
खंडोबाच्या पालखीचे मानकरी : मंगेश मोकाशी, राजेंद्र पवार, नागेश अनभुले यांनीही उत्साहाने आपली सेवा अर्पण केली.

यावेळी पुजारी परंपरेतून बापूराव पुजारी, दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, ओंकार पुजारी, रोहित पुजारी, संदीप पुजारी, महेश कवादे यांसह पुरोहित रविराज पुराणिक, रंगनाथ पुराणिक, शशिकांत पुराणिक उपस्थित होते.
✺ कार्यालयीन कामासाठी कर्मचारी हवा आहे.
कार्यालयीन कागदपत्रे, संगणक व फोन हाताळणीचे कामासाठी कर्मचारी पाहिजे.
✺ शैक्षणिक पात्रता : पदवीधर असल्यास प्राधान्य ..
✺ जबाबदारीने काम करणारा हवा. तत्काळ जॉईन होऊ शकणारा उमेदवार पाहिजे ✺संपर्क:मो.नं.9011355389

कार्यक्रमाला सरपंच अमोल चव्हाण, उपसरपंच सचिन शिंदे, सिद्धेश्वर सोरटे, दीपक थोरबोले, योगेश सोरटे, भाऊसाहेब फुलारी, शिवशंकर फुलारी, इनताज शेख, बबन दिवटे, मनोज जामदार, प्रमोद गायकवाड, लक्ष्मण हवालदार आदी मान्यवरांनी हजेरी लावली.
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त सुशील राठोड, डॉ. रोहन पाटील, शिरीष लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर यांनी केले


