घरगुती वादातून महिलेला मारहाण- पाडळीतील घटना

करमाळा,ता.१: पाडळी (ता.करमाळा) येथे 29 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास 2 वाजता घरगुती वादातून एका महिलेला भावकीतील व्यक्तींनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

यात सुनंदा रावसाहेब ढाणे (वय 60, रा. पाडळी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्या 29 सप्टेंबर ला घरी असताना त्यांचे भावकीतील ज्योतिराम ढाणे व त्यांची पत्नी आश्विनी ढाणे हे त्यांच्या घरासमोर आले. त्यावेळी ज्योतिराम ढाणे मला म्हणाले की, “तू माझ्या पत्नीबद्दल लोकांना काय सांगतेस?” असा जाब विचारला. फिर्यादींनी “मला काही माहिती नाही” असे सांगितल्यावर अनिल वायकर यांनी मला शिवीगाळ करून लाकडी काठीने पाठीवर मारहाण केली.

तसेच ज्योतिराम ढाणे यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आश्विनी ढाणे यांनी चप्पलने तोंडावर मारहाण केली.एवढेच नाहीतर “पुन्हा काही बोललीस तर जीवे मारू” अशी धमकीही दिली.
या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



