‘हमारा संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेचे वांगी नं.1 मध्ये शिबीर संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ‘हमारा संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेचे करमाळा तालुक्यातील वांगी नं.1 मध्ये सोमवारी (दि.२७) शिबीर संपन्न झाले. भारत सरकारच्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत या उद्देशाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे नियोजन केले आहे. पंतप्रधान स्वनिधी,उज्वला,मुद्रा लोन, वंदे भारत ट्रेन, खेलो इंडिया अशा १७ विविध योजनांची माहिती वैशिष्ट्यपूर्ण व्हॅन द्वारे देण्यात आली.

करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये १५ डिसेंबर पर्यंत ही यात्रा पोहचणार आहे. भारत सरकारच्या विविध योजनांच्या बाबत माहीती याद्वारे दिली जात आहे. यावेळी लाभार्थ्यांना उज्वला गॅस चे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रा.प.सदस्य दत्तात्रय देशमुख, तानाजी देशमुख, हरिभाऊ तकीक,ग्रामसेवक तांबोली, रावसाहेब देशमुख, सुधीर देशमुख, कालिदास भोसले, सोमा ढावरे,दत्ता काशीद, जिल्हा बँकेचे श्री. शिंदे, श्री. रोकडे, आत्मा व कृषी व बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावात मिळत आहे, शेवटच्या घटकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करू. शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी संकल्प यात्रेबरोबर गावागावात जाऊन विविध योजनांची माहिती दिली तर या योजनेचा हेतू साध्य होईल.
– दत्तात्रय(बापू) देशमुख, ग्रा.पं. सदस्य वांगी नं.1, ता.करमाळा

