उमरड-पूर्व सोगाव लोकवर्गणीतून होणाऱ्या रस्त्याला 'प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन'चा हातभार - Saptahik Sandesh

उमरड-पूर्व सोगाव लोकवर्गणीतून होणाऱ्या रस्त्याला ‘प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन’चा हातभार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उमरड -पूर्व सोगाव हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे.रस्त्यावर जाणे-येणे ही सर्व सामान्याला अवघड होवून बसले आहे.कारण रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रस्त्याला पडलेले खड्डे,पाईप लाईनच्या चाऱ्या यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.

तेव्हा लोकांनी लोकवर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे.यासाठी आज ,प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी पूर्व सोगाव या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेतली आणि रस्त्यासाठी मदतीचा हात पुढे केला.तसेच ग्रामस्थांबरोबर रस्त्याची समस्या, शिक्षणासाठी होणारी मुलांची हेळसांड, उसाचा प्रश्न, लाईटचा प्रश्न या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

सोगाव ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे, प्रा.रामदास झोळ स्वतः गावात आले व त्यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.या प्रसंगी पूर्व सोगावचे नेमीनाथ (तात्या) सरडे, रेवणनाथ निकत, ज्ञानेश्वर गोडगे,भाऊ राखुंडे, तानाजी राखुंडे, राहूल गोडगे, ब्रम्हदेव सरडे, अतुल गोडगे,नंदा किशोर सरडे,भागवत मांढरे, सुनील मांढरे,बापु मुळे तसेच उमरड गावचे ग्रामस्थ संदिप मारकड, श्रीकांत मारकड, भाग्यवंत बंडगर आणि गणेश मारकड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!