भारत जाधव यांना मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : वडशिवणे (ता.करमाळा) येथील अजितदादा पवार विद्यालयाचे सहशिक्षक भारत रोहिदास जाधव यांना जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील हुतात्मा स्मृती भवन या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचे सुभाष माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
शिक्षण उपसंचालक पुणे औदुंबर उकिरढे, विकास गरड माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर,प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार संजय जाहीर यांच्या उपस्थित पार पडला. ग्रामीण भागात राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य बजावणारे तसेच मुलांना विद्यार्थी व समाजातील कुटुंबातील एक घटक समजून त्यांना अध्यापनाचे काम केले व अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी विशेष प्रयत्न कला कौशल्य व वाचनाची आवड निर्माण केली याबद्दल त्यांना हा आदर्श पुरस्कार मिळाला.
या पुरस्कार बद्दल संस्थेचे संस्थापक मारूती पारखे, मुख्याध्यापक भिमराव भोसले व केंद्र प्रमुख साईनाथ देवकर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इन्स्पेक्टर श्री.पाटील पत्रकार संजय जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.