'दे धक्का' आंदोलन तूर्तास स्थगित : यशपाल कांबळे -

‘दे धक्का’ आंदोलन तूर्तास स्थगित : यशपाल कांबळे

0


करमाळा(दि.३१) : रावगाव (ता.करमाळा) येथे स्टेरिंग रॉड तुटून जो अपघात झाला होता त्यामधील अपघात ग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 2 जानेवारी 2025 रोजी करमाळा प्रशासन दरबारी घोषणाबाजी करत पुढील काळामध्ये आम्ही आंदोलन करू असे निवेदन देण्यात आले होते पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नव्हती त्यानंतर वंचित आघाडीचे यशपाल कांबळे यांनी 21जानेवारी 2025 रोजी निवेदन दिले त्यामध्ये विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 31जानेवारी 2025 रोजी एसटी आगार प्रमुखांच्या पुतळ्याला दे धक्का आंदोलनाचे आयोजन केले होते तत्पूर्वीच प्रशासनाकडून लिखित स्वरूपात मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले, त्यामुळे सदरचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.


मागण्या पुढील प्रकारे मान्य झालेल्या आहेत
1)रावगाव येथे स्टेरिंग रॉड तुटून बस क्रमांक एम एच १३ सी यु 78 83 चा एक दिनांक 31.12.2024 रोजी अपघात झालेला होता त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून सदर अपघातास जबाबदार चार कर्मचाऱ्यांवर खाते अंतर्गत प्रमादीय कारवाई करण्यात आली आहे.
2) बस क्रमांक एम एच 13 सीयू 7883 चे फिटनेस मुदतीत(16.10.2025) पर्यंत वैद्य आहे व विमा देखील मुदतीत(31.3.2025) वाढवून घेतलेला आहे.
3) सदर अपघातातील जखमी प्रवाशांना रा.प. नियमानुसार तत्कालीन आर्थिक मदत त्याचवेळी रोखीने देण्यात आलेले आहे व पुढील अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.
4) बसेस वेळेत सुटत नसलेल्या तक्रारीचे दखल घेऊन सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेत मार्गस्थ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिलेल्या असून तशी खबरदारी घेण्यात येत आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र देखील उभारण्यात आले आहे.
5) संगम चौकात होणारी वाहतुकीची कोठे टाळण्यासाठी आज रोजी पासून वाहतूक वळविण्याबाबत संबंधितांना तात्काळ आदेश दिलेले आहेत.
6) याबाबत शासन स्तरावर ती नवीन बसेस घेण्याबाबतची प्रक्रिया चालू आहे.
तरी उपरोक्त सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून आपण आपले दिनांक 31 1.25 रोजीचे दे धक्का आंदोलन स्थगित करावे असेही नमूद करण्यात आले. सर्व मागण्या मान्य झाल्या कारणाने आज (ता.31) रोजी होणारे दे धक्का आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलेले आहे असे यशपाल कांबळे यांनी जाहीर केले व प्रशासनाचे आभार ही मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!