मकाईचे चेअरमन भांडवलकर यांच्या सोबत झालेली चर्चा फिस्कटली – प्रा.गायकवाड याचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मकाई सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाची ऊस उत्पादकांची पहिला हप्त्याची असलेली २६ कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना न दिल्याबद्दल निलज येथील शेतकरी प्राध्यापक राजेश गायकवाड तीर्थक्षेत्र संगोबा येथे दि.३१ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत.

काल (दि.४ नोव्हेंबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघल्यामुळे ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे प्रा.राजेश गायकवाड यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

काल (दि.४ नोव्हेंबर) शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे बळीराजा संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णा सुपनवर,करमाळा बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शिवसेनेचे कोळगाव शाखाप्रमुख नागेश चेंडगे, हिवरवाडीचे शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदींनी उपोषण स्थळी भेट दिली. व प्रा.गायकवाड व इतर जणांशी चर्चा केली. चेअरमन दिनेश भांडवलकर यांना फोन लावून उपोषण स्थळी बोलवण्यात आले.

यानंतर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघल्यामुळे ही चर्चा फिस्कटली. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी मात्र ठाम भूमिका घेऊन रश्मी बागल कुटुंबातील एका सदस्यांनी या ठिकाणी येऊन उपोषण करताना ऊस बिल देण्याचे आश्वासन द्यावे व रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावी अशी भूमिका घेतली.

यावेळी प्राध्यापक राजेश गायकवाड यांनी सुद्धा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे रक्कम जमा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे सांगितले। यामुळे चर्चा फिस्कटली. आज (दि.५) उपोषणाचा सहावा दिवस असून कारखाना प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागील हंगामात राजेश गायकवाड यांचा फक्त १८ टन ऊस मकाईला गेला होता परंतू अनेक शेतकऱ्यांचा अडीशे ते तीनशे टनापर्यंत ऊस गेलेला आहे. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांची अडचण, तळमळ पाहून त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे तरी सर्व स्तरातील पुढारी, संघटना आणि शेतकरी सभासदांनी, हितचिंतकांनी उपोषणस्थळी (संगोबा) उपस्थित राहून उपोषणकर्ते राजेश गायकवाड यांना पाठबळ द्यावे.

सौ लक्ष्मी संजय सरवदे, सरपंच, घारगाव (ता.करमाळा)
घारगावच्या सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी प्रा.गायकवाड यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!