केम स्टेशनवर थांबा मंजूर झालेल्या २ एक्स्प्रेसचे वेळापत्रक झाले जाहीर
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केम स्टेशनवर नुकत्याच दोन एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. पंढरपूर एक्स्प्रेस ६ जानेवारीला तर हैदराबाद एक्स्प्रेस ७ जानेवारी पासून सुरू होणार आहे. याविषयी मध्य रेल्वेने एक परिपत्रक जारी केले आहे.
यातील पहिली एक्स्प्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)- पंढरपूर स्टेशन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई). गाडी नंबर ११०२७/११०२८.
ही एक्स्प्रेस आठवड्यातुन ३ दिवसच चालू असते. सोमवार, शुक्रवारी व रविवार या दिवशीच ही रेल्वे प्रवास करते. ही रेल्वे ६ जानेवारी पासून केम स्टेशनवर थांबणार आहे.
दुसरी एक्स्प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)- हैदराबाद स्टेशन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ही आहे. या गाडीचा नंबर आहे २२७३१/२२७३२. ही गाडी दररोज प्रवास करत असून ही गाडी ७ जानेवारीपासून केम स्टेशनवर प्रवाशांसाठी थांबा घेणार आहे.
या एक्स्प्रेसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
वरून पंढरपूर स्टेशनला जाणारी एक्स्प्रेस (गाडी नंबर ११०२७) ६.१४ वाजता केम स्टेशनवर येणार असून ६:१५ ला प्रस्थान करेल.
पंढरपूर स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) कडे जाणारी एक्स्प्रेस रेल्वे (गाडी नंबर ११०२८) २२:५४ वाजता केम स्टेशनवर येणार असून २२:५५ ला प्रस्थान करेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
वरून हैद्राबाद स्टेशनला जाणारी एक्स्प्रेस (गाडी नंबर २२७३२) २०.३४ वाजता केम स्टेशनवर येणार असून २०:३५ ला प्रस्थान करेल.
हैद्राबाद स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) कडे जाणारी एक्स्प्रेस रेल्वे (गाडी नंबर २२७३१) ६.०४ वाजता केम स्टेशनवर येणार असून ६:०५ ला प्रस्थान करेल.
जेऊर रेल्वे वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा – https://saptahik-sandesh.com/saptahik-sandesh-jeur-railway-station-timetable-page/