दुर्गसेवक करमाळाकर यांची येत्या रविवारी दुसरी स्वच्छता मोहीम - इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन - Saptahik Sandesh

दुर्गसेवक करमाळाकर यांची येत्या रविवारी दुसरी स्वच्छता मोहीम – इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  करमाळा शहराला एक ऐतिहासिक वारसा असून या शहराचा इतिहास जर जपायचा असेल तर आपल्याला येथील ऐतिहासिक स्थळांना जपायला हवे हा विचार घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या वतीने दुसरी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. ही स्वच्छता मोहीम येत्या रविवारी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करमाळा शहरातील ऐतिहासिक बारव येथून होणार आहे.

या ग्रुपच्यावतीने पहिली मोहीम ८ ऑक्टोबर रोजी पार पडली होती. यात भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली होती. यापुढे अजून वेगवेगळ्या मोहीम आखल्या जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.

करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न

रविवारी (दि.८) झालेल्या या मोहिमेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईराणी यांच्या माहेरकडील वंशज तेजराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. याबरोबरच या मोहिमेसाठी ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या सदस्यांसह करमाळा शहरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. युवकांनी हातात फावडे, कोयता, कुऱ्हाड, पाट्या हातात घेऊन बुरुजावर उगवलेली छोटी-मोठी काटेरी झाडे झुडुपे तोडली. गवतावर औषध फवारणी करण्यात आली. वुडकटर मशिनच्या साहाय्याने बुरुजावर उगवलेली मोठी झाडे तोडली. फावड्याने स्वच्छता केली. याची व्हिडीओ बातमीत खाली दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!