केम येथील डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारिणीची निवड संपन्न

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त उत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या उत्सवसमितीच्या अध्यक्षपदी आनंद ओहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याच बरोबर इतरही निवडी करण्यात आल्या. उपाध्यक्षपदी प्रथमेश देडगे, खजिनदारपदी शुभम गाडे, सचिव रमेश मखरे, सहसचिव अतुल गायकवाड, प्रविण मखरे, मिरवणूक प्रमुख – माजी सभापती शेखर गाडे, पत्रकार प्रविण मखरे, बळिराम ओहोळ संतोष गायकवाड, भालचंद्र गाडे, मधुकर ओहोळ,सजावट प्रमुख – प्रसाद गाडे, संदिप गाडे, प्रशांत गाडे, मेजर निलेश ओहोळ, सुमित गाडे सोहोल गाडे, प्रज्वल पोळके, शिवम सरवदे आदी जणांची निवड झाली आहे.
दि १४ एप्रिल रोजी गांधी चौकात डाॅ बाबासाहेब आबेंडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन तर १५ एप्रिल ला समाज प्रबोधानकार इंजिनिअर पवन दबडे यांचे व्याखान आयोजित केले आहे.
२७ एप्रिल रोजी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकानी दिली.
या वेळी नूतन अध्यक्ष आनंद ओहोळ म्हणाले की, महामानव परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.





