डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केम येथे खेळ पैठणीचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन - Saptahik Sandesh

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केम येथे खेळ पैठणीचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन

केम(दि.१५) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १४ एप्रिल रोजी असलेल्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान केम येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शालेय उपक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.शालेय विद्यार्थ्यांसाठी 11 एप्रिल पासून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, खेळ पैठणीचा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अध्यक्ष समाधान गाडे यांनी दिली आहे. 20 एप्रिल रोजी सायं 5 वाजता पारंपरिक पद्धतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वर्षीची 134 वी भीमजयंती मिरवणूक सोहळा हा प्रमुख आकर्षणाचा मुद्दा ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष समाधान गाडे, उपाध्यक्ष नागनाथ कांबळे, सचिन रणशृंगारे तसेच ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ, योगेश ओहोळ, दिपक पोळके,सचिव प्रणय देडगे,वसंत वजाळे, लोकेश बनसोडे,किशोर पोळके, मधुकर गाडे, महेश कांबळे, सुधीर गाडे, महेश ओहोळ, मुनीराज पोळके,दशरथ गाडे, गुलचंद गाडे, अशोक ओहोळ,वसंत ओहोळ, राम गाडे, कांतीलाल गाडे, सोमनाथ कांबळे,भगवान गाडे, दयानंद बनसोडे,चकोर गाडे, तुषार गायकवाड,सत्यशील ओहोळ, सचिन पोळके,गणेश ओहोळ, विक्रम ओहोळ, रितेश ओहोळ,स्वप्नील कांबळे,अमोल गाडे, नाना गाडे, राज पोळके, शाम पोळके, सुधीर धोत्रे, दिपक ननवरे, अतुल पवार आदी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुलेखन – प्रशांत खोलासे, केडगाव (ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!