दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना गंगुबाई शिंदे हॉस्पिटलकडून मोफत गोळ्या-औषधे वाटप

करमाळा(दि.१५): नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जाणाऱ्या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची रुग्ण तपासणी करून सुमारे 1000 वारकऱ्यांना मातोश्री गंगुबाई शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करून मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. ओंकार उघडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक नागेश शेंडगे पाटील यांनी हे शिबिर यशस्वी पार पाडले.
नाथषष्ठी निमित्त पंढरपूर येथून ह भ प रंजीत बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडी पैठण कडे रवाना होत आहे.या दिंडीमध्ये ह भ प बळीराम वायकर ह भ प बाबासाहेब सुरवसे ह भ प उद्धव महाराज ह भ प तुकाराम महाराज हब पलकर महाराज माऊली महाराज ह भ प दादा महाराज चोपदार अरुण वाघ भाऊ पवार मच्छिंद्र माने यास हजारो वारकरी 300किलोमीटर चालत पंढरपूरचा पालखी सोहळा पैठणला नेणार आहे.
यातील वारकऱ्यांना लागणाऱ्या थंडी ताप सर्दी कॅल्शियम यासारख्या तत्सम आजवरचे औषध उपचार मुक्त देण्यात आले. गुडघेदुखी पाठ दुखी पाय दुखी साठी विविध मलम देण्यात आले. पायाला चोळण्यासाठी मलमबाम देण्यात आली.
यावेळी बोलताना डॉक्टर ओंकार उघडे म्हणाले की, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन असून यात्रा जत्रा या ठिकाणी ज्यांना आरोग्य शिबिर घेण्याची असेल भाषा सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचे संपर्क साधावा आव्हान केले.





